खासदार अशोक चव्हाण, भाजप महायुती राज्य सरकार / MP Ashok Chavan, BJP Grand Alliance State Government Pudhari News Network
नांदेड

पूर्वी नकार; पण २५ वर्षांनंतर 'नांदेड भूषण'साठी चव्हाणांचा होकार !

२२ फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान सोहळा : यंदाच्या नरेन्द्र देवेन्द्र महोत्सवाला नवा आयाम

पुढारी वृत्तसेवा

After 25 years, Chavan accepts the 'Nanded Bhushan' award

विशेष प्रतिनिधी

नांदेड : शिवसेनेचे माजी आमदार, दिवंगत प्रकाश खेडकर यांनी मागील शतकात सुरू केलेल्या नदिड भूषण पुरस्कार ह्या उपक्रमांत मागील काही वर्षे खंड पडल्यानंतर यंदा त्याची नव्याने सुरुवात करताना यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ नेते खा. अशोक चव्हाण यांना जाहीर झाला आहे. पूर्वी त्यांनी हाच पुरस्कार नाकारला होता.

रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला हा पुरस्कार चव्हाण यांना येत्या २२ फेब्रुवारी रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'नरेन्द्र देवेन्द्र' महोत्सवात प्रदान केला जाणार असल्याचे संयोजक दिलीप ठाकूर यांनी नुकतेच जाहीर केले.

(कै.) प्रकाश खेडकर यांचे सहकारी राहिलेले दिलीप ठाकर मागील दोन दशकांपासून नांदेडमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात. पहिला नदिड भूषण पुरस्कार प्रजावाणीचे माजी संपादक सुधाकर डोईफोडे यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर नांदेडमधील अन्य काही मान्यवरांचाही ह्या पुरस्काराने सन्मान झाला. त्यांत कॉ. अनंतराव नागापूरकर, माजी कुलगुरू गो. रा. म्हैसेकर, चित्रमहर्षी त्र्यंबक वसेकर यांचा समावेश होता. पण खेडकर यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या परिवारानं नांदेड भूषण पुरस्काराच्या उपक्रमांत सातत्य तसेच मागील काही वर्षांतल्या मानकऱ्यांची नावे जाहीर करून वरील उपक्रमाचे पुनरुज्जीवन पुजारी राखले नाही.

ठाकूर यांनी यंदाच्या विशेष केले आहे, पहिला पुरस्कार प्रदान झाल्यानंतर दुसन्या वर्षीच्या पुरस्कारासाठी तेव्हा काँग्रेसचे मंत्री असलेल्या चव्हाण यांना विचारणा करण्यात आली; पण पुरस्कार देणारी संस्था मीनाताई ठाकरे यांच्या नावाची आणि त्यांतील कर्तेधर्ते शिवसेने-चेच होते. त्यामुळे चव्हाण यांनी तेव्हा असमर्थता दर्शविली; पण नंतरच्या काळात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये जबाबदारी पार पाडली आणि कालांतराने भाजपात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर 'नरेन्द्र आणि देवेन्द्र' यांच्या नावाखाली होणाऱ्या महोत्सवात 'नांदेड भूषण पुरस्कार स्वीकारण्यात चव्हाण यांना राजकीय अडचण राहिली नाही, खळखळ न करता त्यांनी यंदाचा पुरस्कार स्वीकारण्यास संमती दिल्यामुळे गंदाच्या महोत्सवाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द खच्या अथनि १९८७ साली लोकसभेच्या खासदारकीपासून सुरू झाली. या कारकिर्दीस चार दशके पूर्ण होत असताना, त्यांना त्यांच्या कर्मभूमीतील पहिला मोठा पुरस्कार नव्या वर्षात जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी नांदेड मनपा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमताचे उल्लेखनीय यश मिळवून दिले. त्यानंतर स्थानिक राजकारण आणि सार्वजनिक बाबींमध्ये ते अधिक लोकाभिमुख होत असल्याचे दिसून आले.

अन्य चार मानकरी

यंदाचा नांदेड भूषण पुरस्कार म्हणजे 'पंचवार्षिक योजना' ठरला आहे. मागील चार वर्षांचे पुरस्कार अनुक्रमे मनपाचचे माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे, प्रसिद्ध निवेदक अॅड. गजानन पिंपरखेडे, व्यावसायिक गंगाप्रसाद तोष्णीवाल आणि रमेश पारसेवार यांना जाहीर झाले आहेत. त्याशिवाय 'सुधाकर भूषण' पुरस्कारासाठी पाच स्थानिक पत्रकारांची निवड यापूर्वीच करण्यात आली, या सर्वांना २१ तारखेला गौरविण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT