Action taken against illegal sand transport; goods worth ₹18 lakh seized
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार लिंबगाव आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत एकूण १८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पिल्या कारवाईत, लिंबगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर यांच्या पथकाने बोरगाव (तेलंग) पाटीजवळ ३ ब्रास रेतीसह टाटा टिप्पर (क्र. एमएच १२ एव्ही ७८५९) पकडले. पोलिसांनी १२ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालक-मालक बालाजी कामाजी पिसाळ (वय ४६, रा. कावलगाव, जि. परभणी) याच्यावर गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या कारवाईत, नांदेड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने असर्जन येथील मारोती मंदिराजवळ सापळा रचून २ ब्रास वाळूने भरलेले दोन टाटा ४०७ टेम्पो (क्र. एमएच २४ जे ६०६४ आणि एमएच ०४ एफपी १४५२) जप्त केले. या कारवाईत ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एक चालक फरार; पोलिस शोधात
कारवाईदरम्यान एक चालक वाहन सोडून फरार झाला, तर युवराज अंबादास जाधव (रा. गोवर्धनघाट, नांदेड) या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.