Nanded Accident : भरधाव टिप्परने चिमुकल्या बालकाचा घेतला बळी File Photo
नांदेड

Nanded Accident : भरधाव टिप्परने चिमुकल्या बालकाचा घेतला बळी

एका भरधाव टिप्परने मामाच्या गावी आलेल्या अवघ्या तीन वर्षीय बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

A speeding tipper killed a small child

नांदेड, पुढारी वृत्तसेवा

शहरानजीकच्या नवीन कौठा भागातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पीव्हीआर टॉकीजसमोरील रस्त्यावर एका भरधाव टिप्परने मामाच्या गावी आलेल्या अवघ्या तीन वर्षीय बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. २८) सकाळी घडली.

या अपघातात बालकाचे आजोबाही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने नांदेड शहर हादरले असून, नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.

मयत बालकाचे नाव प्रणव संपत आचार्य (रा. बाघझरी, ता. अंबाजोगाई) असे आहे. घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रणव हा आपल्या आजोबा राजेश माधवराव भुतके यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास, पी.व्ही. आर. चौकात समृद्धी महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या टिप्पर (क्रमांक आरजे-०४, जी.डी. ८७५१) ने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत आजोबा राजेश भुतके हे गंभीर जखमी झाले, तर नातू प्रणव टिप्परखाली चिरडला जाऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मामाच्या गावी आलेल्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मध्यस्थी करून नातेवाईकांची समजूत काढली.

चालकावर गुन्हा दाखल, नातेवाइकांचे आंदोलन

याप्रकरणी बालकाचे मामा नागेश राजेश भुतके यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक केसाराम थानाराम (वय ४०) याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने संतप्त झालेल्या बालकाच्या नातेवाईकांनी पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT