Nanded News : निवडणूक प्रशिक्षणास ५४ अधिकाऱ्यांची दांडी File Photo
नांदेड

Nanded News : निवडणूक प्रशिक्षणास ५४ अधिकाऱ्यांची दांडी

जि. प., पं. स. निवडणूक; गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटीस

पुढारी वृत्तसेवा

54 officers were absent from the election training

पैठण, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट १८ पंचायत समिती गणासाठी निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे, सह निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि.२४ रोजी निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती केलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण प्रथम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५४ मतदान अधिकारी गैरहजर राहिले असून त्यांना नोटीस बजविण्यात आली आहे.

निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे, सह निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पवार यांनी निवडणूक कामकाजासाठी विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करून निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण घेण्याचा आदेश देण्यात आल्याने. शनिवारी रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या येथील संतपीठ प्रशासकीय इमारतीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष मतदान, अधिकारी यांच्यासाठी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

यावेळी नियुक्ती केलेले १ हजार ५७९ कर्मचारी यांना निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे, सह निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, डॉ. मंगेश अंबिलवादे, रेवनाथ खेडकर, अमोल पाखरे, गहिनीनाथ वीर, शुभम घटे यांनी प्रशिक्षण दिले. परंतु निवडणूक विभागाचा आदेश असतानादेखील नियुक्ती करण्यात आलेले ५४ मतदान अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आले असून. गैरहजर संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पुढील कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

गैरहजर कर्मचाऱ्यांचा अहवाल कलेक्टरांकडे

पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामकासंदर्भात नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. निवडणूक विभागाकडून निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेले असून. प्रशिक्षण प्रसंगी गैरहजर असलेल्या निवडणूक प्रक्रियेतील मतदान अधिकारी, कर्मचारी यांना कारणे दाखव नोटीस निवडणूक विभागाकडून दिल्या जाईल व गैरहजर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कारणाची पडताळणी करून सदरील अहवाल वरिष्ठाकडे सादर करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT