Nanded News : १९ वर्षीय विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला file photo
नांदेड

Nanded News : १९ वर्षीय विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला

नांदेडच्या अशोकनगर भागातील घटना

पुढारी वृत्तसेवा

19-year-old female student attacked with a sharp weapon

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: खासगी शिकवणीसाठी निघालेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर आरोपीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नांदेड शहरातील अशोकनगर भागात सोमवारी (दि.5) रोजी दुपारी घडली.

शहराच्या तरोडा (बु.) भागात असलेल्या दीपकनगर येथील 19 वर्षीय विद्यार्थिनी अशोकनगर भागात असलेल्या एका नामांकित खासगी क्लासेसमध्ये शिकवणीसाठी निघाली होती. ती एकटी असल्याचे पाहून तिच्या मागावर असलेला आरोपी रोहित पोहरे याने अशोकनगर भागात त्याच्या जवळील धारदार शस्त्राने विद्यार्थिनीवर वार केले. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली.

घटना घडल्यानंतर याच परिसरातील काही विद्यार्थ्यांनी तातडीने जखमी विद्यार्थिनीला शहराच्या शिवाजीनगर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विद्यार्थिनीवर वार केलेला आरोपी रोहित हा घटनास्थळावरून पसार झाला होता.

भाग्यनगर पोलिस स्थानकातील पो.उप.नि. संकेत सवराते, पोलिस कर्मचारी शरदचंद्र चावरे, गंगाधर कांबळे, चालक केशव तांबोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली व पसार झालेल्या आरोपी रोहित यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT