Nanded Drought News : बांधावर दुष्काळ नुकसानीच्या गांभीर्याने व अचूक नोंदी घ्या..!

सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांची अधिकाऱ्यांना सूचना
Nanded Drought News
Nanded Drought News : बांधावर दुष्काळ नुकसानीच्या गांभीर्याने व अचूक नोंदी घ्या..!file photo
Published on: 
Updated on: 

Nanded News: Record the drought-related damage accurately and with due seriousness right at the farm site!

वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा माहुर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभुमिवर वाई बाजार व वानोळा गटातील गावातील शेती पिकांच्या झालेल्या गंभीर नुकसानीची थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी बि. सरवनन एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घेण्याची सूचना उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली..

Nanded Drought News
Nanded Gambling Raid : जुगार अड्ड्यावर किनवट पोलिसांची धडक कारवाई

माहूर तालुक्यात ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही पाऊस न पडल्याने माहुर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभुमिवर सहाय्यक जिल्हाधिकारी बि. सरवनन आणि माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत वाई बाजार व वानोळा परिसरातील बाधित शेतांची दि. २ रोजी संयुक्तरीत्या पाहणी आली.

यावेळी वाई सज्जाच्या मंडळ आधिकारी योगिता राठोड यांच्यासह तलाठी राम ठाकरे, महिला पोलीस पाटील सौ. आशा बळीराम मोरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती वर्षा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अजय सावळे यांच्यासह महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने वाई बाजार आणि वानोळा गटातील सर्व गावातील शेतातील वाळलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे पाण्याअभावी अतोनात नुकसान झालेले दिसुन आले.

Nanded Drought News
Nanded Crime News : पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त; एकास अटक

पाहणी दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या. "पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे पिके तर जळालीच..! शिवाय जनावरांच्या चाऱ्यांचा आणि पिण्याच्या पाण्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. सोबतच दुष्काळग्रस्त सवलती जाहीर तातडीने कराव्यात अशी आर्त साद बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला घातली.

तथापि, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी उपस्थित तलाठी व कृषी सहाय्यकांना स्पष्ट सुचना देताना, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन त्वरित आणि वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले. सर्व नुकसानीचा एकत्रित अहवाल तयार करून तो तातडीने राज्य शासनाकडे भरपाईसाठी पाठवला जाईल. असे आश्वासन सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांनी दिले. या पाहणी दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून तात्काळ मदतनीधीचे वाटप करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news