Nanded | एकाच रात्री तीन चोऱ्या; पहाटेच्या अंधारात लाखोंचा ऐवज लंपास

Three Thefts in One Night, Valuables Worth Lakhs Stolen | नांदेड–नरसी महामार्ग चोरट्यांच्या निशाण्यावर
theft
theftPudhari
Published on: 
Updated on: 

नायगाव : कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदेड-नरसी महामार्गालगत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दि. ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर ते पहाटेच्या सुमारास देगाव शिवारात चोरट्यांनी सलग तीन ठिकाणी डल्ला मारून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल तसेच दुकानातील खाद्यपदार्थ लंपास केले. एकाच परिसरात घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालीय. कुंटूर पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

देगाव शिवारातील माणिकप्रभू पेट्रोल पंपासमोर परराज्यातील वाहन उभे असताना चोरट्यांनी वाहनचालकाचा मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याचे सांगण्यात येते. पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. यानंतर चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या ‘द गार्डन गॅलरी’ नर्सरी येथे मजुरी करणारे रामचंद्र गणेश चनेबोईनवाड यांच्या घराला लक्ष्य केले.

कुटुंबीय झोपेत असतानाच घरातील लोखंडी पत्र्याची पेटी चोरून नेण्यात आली. काही अंतरावर ही पेटी फोडून त्यातील सुमारे २० हजार रुपये रोख, १२ ग्रॅम सोन्याचे नेकलेस तसेच लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे ‘ओम’ पान असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. याच परिसरातील साई पेट्रोल पंपासमोरील चिंचवड यांच्या दुकानाचे पत्रे काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील रोख रकमेसह खाण्यापिण्याच्या वस्तूंवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

theft
Nanded Crime News : पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त; एकास अटक

नांदेड-नरसी महामार्ग हा सतत वर्दळीचा मार्ग असून, या परिसरात परराज्यातील वाहनेही मोठ्या प्रमाणावर थांबतात. अशा संवेदनशील भागात पहाटेच्या अवघ्या काही तासांत चोरट्यांनी एकामागून एक तीन ठिकाणी चोरी करणे गंभीर बाब मानली जात आहे. कुंटूर फाटा व महामार्ग परिसरात रात्री नियमित गस्त असल्याचे सांगितले जाते. मात्र, एकाच रात्री चोरट्यांनी एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी फिरून चोरी केलीय. त्यामुळे नागरिकांकडून कडक गस्तीची मागणी होतेय. महामार्गावर संशयास्पद वाहनांची तपासणी, रात्रीच्या वेळी आस्थापनांवर नजर आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांची उपस्थिती अत्यावश्यक आहे.

चोरट्यांचा माग कधी लागणार?

एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने कुंटूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चोरी करणाऱ्या टोळीचा माग काढून आरोपींना तातडीने जेरबंद करणे, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे आणि महामार्ग परिसरातील रात्रीची गस्त अधिक प्रभावी करणे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच चोराच्या मुसक्या कधी आवळणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

theft
Nanded Gambling Raid : जुगार अड्ड्यावर किनवट पोलिसांची धडक कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news