मराठवाडा

नांदेड : मरखेलमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा

मोहन कारंडे

मरखेल, पुढारी वृत्तसेवा : मरखेल येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातून रॅली काढून 'सर्वधर्म समभाव' असा नारा देण्यात आला. रॅलीला मुस्लिम बांधवसमवेत गावातील सर्वधर्मीय लोकांनीही सहभाग नोंदविला.

आज सकाळी मुस्लिम समाजाच्या वतीने येथील जामा मशिदीमध्ये अन्नदान करण्यात आले. यानंतर गावतून मिरवणूक काढीत प्रेषितांनी दिलेल्या संदेशांना उजाळा देण्यात आला. या रॅलीत पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे, सरपंच मच्छीन्द्र गवाले, उपसरपंच संदीप पाटील, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सादिक मरखेलकर, गफ्फार अत्तार, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT