मराठवाडा

औरंगाबाद : मुलासह महिलेची विहिरीत आत्महत्या, गुन्हा दाखल

स्वालिया न. शिकलगार

पैठण : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील कारकीन येथे पती नेहमी चारित्र्यावर संशय घेत असल्याने स्वत:च्या शेतात असलेल्या विहिरीत ३० वर्षीय विवाहित महिलेने चार वर्षाच्या लहान बाळासह आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मंगळवारी दि. ३१ रोजी दुपारी उघडकीस आल्यानंतर महिलेचे वडील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवार रोजी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारकीन (ता. पैठण) येथील बानोबी शहाजान शहा (वय ३०) या महिलेचा पती नेहमी चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून भांडण झाले होते. सोमवारी झालेल्या वादामुळे बानोबी शहा त्यांच्या अल्तमश शहाजान शहा या चार वर्षीय लहान बाळासह घरातून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बाहेर निघून गेली होती. सोमवारी दि. ३० रोजी मध्य रात्री तिने स्वत:च्या शेतातील विहिरीत लहान बाळासह उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.

मंगळवारी दुपारी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बानोबी शहा व लहान बाळाचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यावेळी डीवायएसपी डॉ. विशाल नेहूल, एमआयडीसी सपोनि भागवत नागरगोजे, जमादार कर्तारसिंग सिंघल व दिनेश दाभाडे पंचनामा करून पोलीस ठाण्यात नोंद केली होती.

बुधवारी रात्री मयत महिलेचे वडील बादल शेरअली शेख (रा. हमरापूर, ता. वैजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती शहाजान छोटेमियाँ शहा (रा. कारकीन) विरुद्ध बुधवारी रात्री ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि भागवत नागरगोजे हे करीत आहे.

SCROLL FOR NEXT