Stray Dog Pudhari
लातूर

Stray Dogs News : भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने तरुणाचा मृत्यू

मृतदेह थेट महानगरपालिकेच्या दारात

पुढारी वृत्तसेवा

Young man dies after being bitten by stray dogs

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा गुरुव-ारी शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट लातूर महानगरपालिकेच्या पायरीवर आणून ठेवत आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरवे कुटुंबातील तरुण तीन दिवसांपूर्वी मच्छी मार्केट भागात लघुशंकेसाठी गेला असता चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करून चावा घेतला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह अॅम्ब्युलन्समधून महानगरपालिकेसमोर थेट आणला. यावेळी महापालिकेचे दोन्ही प्रवेश-द्वार बंद करण्यात आले होते.

आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मृतदेह पालिकेच्या पायरीवर ठेवत जोरदार आंदोलन केले. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. कुत्र्याच्या हल्ल्यात आमच्या कुटुंबातील कर्ता तरुण गमावला आहे.

आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. या प्रकारामुळे महानगरपालिका प्रशासनात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT