Water scarcity : शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाणीटंचाईचे संकट file photo
लातूर

Water scarcity : शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाणीटंचाईचे संकट

साकोळ प्रकल्पात ०.२५, घरणीत ६.१८ टक्के पाणीसाठा; पांढरवाडी तलाव कोरडा

पुढारी वृत्तसेवा

Water scarcity crisis in Shirur Anantpal taluka

शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, प्रमुख जलस्रोतांनी तळ गाठला आहे. तालुक्याची तहान भागवणाऱ्या साकोळ मध्यम प्रकल्पात अवघा ०.२५ टक्के, तर घरणी प्रकल्पात केवळ ६.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे पांढरवाडी प्रकल्प पूर्णतः कोरडा पडल्याने परिसरातील २५ हजारांहून अधिक नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पांढरवाडी तलावावर येरोळ, जांभळवाडी, पांढरवाडी, हनुमंतवाडी या गावांसह तीन वाड्यांची पाणीपुरवठा व्यवस्था अवलंबून आहे. मात्र, तलावातील पाणी संपल्याने नागरिकांसह पशुधनाचीही पाण्यासाठी परवड होत आहे. सांडपाणी व्यवस्थेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २३ गावांसाठी विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि पशुधनासाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या संकटावर मात करण्यासाठ प्रशासनासोबतच समाजातील सव घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी वरंडेकर यांनी केले आहे. मुबलक पाण उपलब्ध असलेल्या शेतकरी व नागरिकांनी गरजूंना मोफत पाणी द्यावे लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व्यापारी आणि दानशूर व्यक्तींनीह पाणीवाटप मोहिमेत सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.

या कार्यात योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्ती व संस्थांचा पंचायत समितीच्या वतीने नागरी सत्का करण्यात येणार असल्याचेही त्यांन जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT