Latur News : भाजपाच्या आंदोलनाने लक्ष वेधले, टिपू सुलतान वक्तव्याचा निषेध

आमदार अमित देशमुखांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी
Latur News
Latur News : भाजपाच्या आंदोलनाने लक्ष वेधले, टिपू सुलतान वक्तव्याचा निषेधfile photo
Published on: 
Updated on: 

BJP protest draws attention; remarks on Tipu Sultan condemned

लातूर, पुढारी वृत्तसेवा : टिपू सुलतान जयंतीनिमित्त आ. अमित देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अमित देशमुख यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

Latur News
Latur News : भूजल पातळीत ४.२० मीटरची घट; रेणापूर तालुक्यात जलसंकट गहिरे

आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी देशमुखांकडून सातत्याने वक्तव्ये करून लातूरकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी केला. टिपू सुलतान यांच्या इतिहासातील धर्मांतर, मंदिरांवरील कारवाई आणि मराठा साम्राज्याविरोधातील संघर्षाचे दाखले असताना त्यांची महापुरुषांशी तुलना करणे चुकीचे असल्याचे कव्हेकर म्हणाले.

मतांचे राजकारण करण्यासाठी समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लातूरच्या पाणीप्रश्नावर देशमुखांनी काय प्रयत्न केले, हे जनतेसमोर स्पष्ट करावे, असे आव्हान देत रेल्वेने पाणी आणण्याच्या निर्णयावर केलेली टीका ही अकार्यक्षमता लपविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Latur News
Rare Indian Vulture : १० हजार किमीचा प्रवास, भारतीय गिधाडाचे लातुरात दर्शन

आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निषेध आंदोलनाच्या वेळी विरोधी पक्षनेते देविदास काळे, प्रदेश प्रवक्ता तथा नगरसेविका प्रेरणा होनराव, सरचिटणीस तुकाराम गोरे आदींनी आ. अमित देशमुख यांच्या अकार्यक्षमतेचा आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला. आंदोलनात गुरुनाथ मगे, देविदास काळे, दीपक मठपती, प्रेरणा होनराव, तुकाराम गोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.