Latur News : चाकुरचा आठवडी बाजार थेट राष्ट्रीय महामार्गावर !

जुने बसस्थानक ते बोथी रोडपर्यंत विक्रेत्यांचा विळखा; अपघाताचा धोका वाढला, प्रशासनाचे दुर्लक्ष
Latur News
Latur News : चाकुरचा आठवडी बाजार थेट राष्ट्रीय महामार्गावर !file photo
Published on: 
Updated on: 

Chakur’s weekly market is right on the national highway!

चाकूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या चाकूर शहरातील आठवडी बाजार गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावर भरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जुने बसस्थानक कमानीपासून सरकारी रुग्णालय, डीसीसी बँक ते बोथी रोडपर्यंत बाजार पसरत असल्याने या मार्गावर वाहतुकीची मोठी कॉडी होत आहे. हा परिसर अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जात असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांत संताप आहे.

Latur News
Rare Indian Vulture : १० हजार किमीचा प्रवास, भारतीय गिधाडाचे लातुरात दर्शन

चाकूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहने, प्रवासी वाहने आणि दुचाकींची सतत ये-जा सुरू असलेल्या याच रस्त्यावर भाजीपाला, फळविक्रेते आणि हातगाड्यांची दुकाने थाटली जातात. तालुक्यातील विविध गावांतून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दीही रस्त्यावर होते.

त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते, तर नागरिकांना जीव मुठीत धरून खरेदी करावी लागते. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी नगरपंचायत कमानीपासून मस्जिद चौक व हनुमान मंदिरापर्यंत बाजार भरत होता. काही काळ जिल्हा परिषद शाळा, बोथी रोड येथे बाजार हलविण्याचे नियोजन झाले; मात्र पुन्हा बाजार रस्त्यावरच भरू लागला.

Latur News
Latur News : ऊस संघर्ष समितीची बैठक; मनसे, प्रहारसह शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

नगरपंचायत, पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने समन्वय साधून बाजारासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी. कायमस्वरूपी स्थलांतर होईपर्यंत वाहतुकीचे नियोजन व पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.