मुख्याधिकाऱ्यांनी केली दुभाजकातील झाडांची पाहणी pudhari photo
लातूर

Latur News : मुख्याधिकाऱ्यांनी केली दुभाजकातील झाडांची पाहणी

उदगीर : झाडांना पाणी घालण्याचे कर्मचाऱ्यांना दिले आदेश

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : उदगीर शहरातील दुभाजकात माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला. यामधून शहराचा सर्व भागात सोयी सुविधा उपलब्ध करून झाडे लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला असताना उदगीर नगरपालिकेकडून झाडांना पाणी न घालता जणू झाडे मारण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आल्याने या दुभाजकातील झाडांची बातमी दैनिक पुढारीने प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेऊन उदगीर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव यांनी नगरपरिषदेचा कर्मचाऱ्यासह या दुभाजकातील झाडांची पाहणी करून तात्काळ झाडांना पाणी घालण्याची कर्मचाऱ्यांना आदेशित केले आहे.

टँकर लावून वाळलेल्या झाडांना दिवस-रात्र पाणी घाला व झाडे हिरवी करा अशी सक्त तंबी मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्याचे शहरात जोरदार चर्चा चालू आहे.मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकात असणारी झाडे पाण्या वाचून सुकून जात असताना पालिकेला या झाडांना पाणी देण्याचे ही भान नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता.

उदगीर शहर सुंदर आणि हिरवेगार दिसावे यासाठी प्रथम येथील उदगीर शहरातील काही निसर्गप्रेमी युवकांनी व शहरातील व्यापारी ज्येष्ठ नागरिकांनी ग्रीन उदगीर या नावाने डॉक्टर झाकीर हुसेन चौक देगलूर रोड दुभाजकाच्या मध्यभागी झाडे लावली होती. ही झाडे जगवण्यासाठी व वाढवण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी असमर्थता दाखवली होती, मात्र सध्याचे मुख्य अधिकारी उदगीर शहरातील हिरवळ सुकत असताना उदगीर नगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत होते.

ही हिरवळ पाणी व देखभालीअभावी अक्षर होरपळून जात होते ,अनेक ठिकाणी या झाडांची पान गळत होऊन नुसती वाळलेली लाकडी शिल्लक राहिलेली आसताना, याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून आल्याने दुभाजकातील झाडे सुकू लागली , तरी नगरपालिकेला जाग येत नाही , या मथळ्याखाली दैनिक पुढारीने बातमी प्रकाशित करतातच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी बातमीची दखल घेऊन दुभाजकातील झाडांची पाहणी करून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना टँकरने पाणी घालून जाडे वाचविण्याचे आदेशित केले आहे.

उदगीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळा उद्घाटन प्रसंगी शहरातील दुभाजकाचा मध्यभागी महागड्या किमतीचे झाडे लावून एका झाडाची किमान 14ते 15 हजार रुपये असून एवढे महागडी झाडे पाण्याविना वाळत आहेत या झाडांच्या मुळ्या पूर्ण सुकून गेल्याने पालिकेला दै,पुढारीच्या बातमीची दखल घ्यावी लागली , दुभाजकात लावलेल्या वाळलेल्या झाडाची पाहणी करीत असताना पत्रकारांनी प्रश्न विचारतात मुख्याधिकारी यांनी धुम ठोकली , शहरातील पत्रकारानी दुभाजकातील वाळलेल्या झाडाबद्दल माहिती विचारत असताना असताना ऑफिसला या असे म्हणत तेथून काढता पाय घेतला .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT