Latur News : लातूर शहरातील दोन कंपन्यांना आग लागून नुकसान File Photo
लातूर

Latur News : लातूर शहरातील दोन कंपन्यांना आग लागून नुकसान

श्रीपाद ट्रेडर्स आणि कटारिया पॉलिमर्स अशी या कंपन्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पुढारी वृत्तसेवा

Two companies in Latur city were damaged in a fire

लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर शहरात एमआयडीसी परिसरातील दोन कंपन्यांना आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना ३ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी घडली. श्रीपाद ट्रेडर्स आणि कटारिया पॉलिमर्स अशी या कंपन्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

आग लागल्या आनंद राजेंद्र शिंदे यांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. घटनास्थळी २५ ते ३० अग्निशमन वाहने तातडीने दाखल झाली आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. या आगीत दोन आयशर आणि एक पिकअप अशा तीन वाहने जळाल्या, परंतु जीवित हानी होण्याचे टळले.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझविण्यात आली. या कार्यात बापूसाहेब जाधव, रोहित बनकर, रोहित सुरजुसे, मुकुंद देशमुख, गिरीश वानखेडे, सुजित कल्याणकर, सुधाकर भिल, आकाश राठोड, आकाश पवार, वैभव आवरगंड, प्रवीण खर्चे, अमोल वाघमोडे, काशिनाथ महाके, सागर पवार, संदेश वाढवणे, आणि मोहन महल्ले यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT