Tractor car accident on Ausa Killari road
ट्रॅक्टर-कार अपघात. Pudhari File Photo
लातूर

लातूर : औसा किल्लारी मार्गावर ट्रॅक्टर कारचा अपघात

पुढारी वृत्तसेवा

लातूर : ट्रॅक्टर व कार अपघातात कारमधील दोन ठार तर एक जखमी झाला आहे. औसा - किल्लारी राष्ट्रीय मार्गावरील फत्तेपुर पाटी येथे शुक्रवारी (दि.२६) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. विवेक दंडगुले (रा. किल्लारी) व सचिन माने (रा. माकणी) अशी या अपघातात ठार झालेल्याची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, एम एच 24 बी आर 5925 ही कार औसा येथून किल्लारी कडे भरधाव वेगाने जात होती. ती फत्तेपूर पाटीजवळ आली असता ती तेथून जात असलेल्या ट्रॅक्टर वर जोरात आदळली व यात तिची डावी बाजू चंदामेंदा झाली. यातील कारमधील दोघे जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. हा अपघात झाला त्यावेळी नागरिक मदतीला धावून आले. प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा विद्या पाटील कारने त्यावेळी तेथून जात होत्या. कार थांबवून त्यांनी व तेथील नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलूवून घेतली व जखमीस उपचारार्थ रुग्णालयात पाठवले.

SCROLL FOR NEXT