Latur Political News : आज स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण  File Photo
लातूर

Latur Political News : आज स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ. कराड यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Today Gopinathrao Munde's statue unveiled by the Chief Minister

लातूर, पुढारी वृत्तसेवा: लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य दिव्य अनावरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि ११ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.

हा पुतळा जिल्हा परिषदेच्या मुख्यालय इमारत परिसरात उभारण्यात आला असून शासकीय जागेत बसवण्यात आलेला मुंडे साहेबांचा पुतळा राज्यातील पहिलाच असेल, सोमवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुतळ्याचे अनावरण करतील.

पुतळा परिसरात अत्यंत सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. जाहीर कार्यक्रम दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असून भव्य मंडप उभारण्यात आला आहे. महिला पुरुष याकरिता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना हा अनावरण सो हळा पाहता यावा यासाठी थेटप्रक्षेपण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमापूर्वी गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनावर आधारित विविध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातून मुंडे साहेवावर प्रेम करणारे असंख्य जण आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी कृषीमंत्री आ. धनंजयजी मुंडे, माजी युवक कल्याण व क्रीडामंत्री आ. संजय बनसोडे, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, औश्याचे आमदार अभिमन्यू पवार, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, आ. विक्रम राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष गोविद केंद्रे, भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर, शिवसेना संपर्कप्रमुख अँड बळवंतराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास जिल्हाभरातील भाजपासह महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर मुंडे साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असेही आवाहन भाजपाचे नेते आमदार रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT