

Gang of thieves from Beed district arrested in Latur
लातूर, पुढारी वृतसेवा: औसा व भादा येथून अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांच्या बीड जिल्ह्यातील सराईत टोळीकडून ०९ गुन्ह्याची उकल झाली असून त्यांच्याकडून २४ लाख ८० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांनी शनिवारी (दि.९) येथे आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
रिहान मुस्तफा शेख, (वय २०) (वय २४) दोघेही रा. गौतम नगर, परळी, हाफीज मुमताजुद्दीन शेख, (वय ३६, रा. आझाद नगर, परळी), सादिक मोहम्मद यासीन मोहम्मद, ( वय ४४, रा. जुना बाजार, बीड), फारुख शेख, (वय २७ रा. बार्शी नाका, बीड) अशी आरोपींची नावे आहेत. दिनांक ०२ ते ०३ ऑगस्ट च्या मध्यरात्री रात्रगस्त दरम्यान औसा व भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या टोळीला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले होते.
त्यांच्यासोबतचे इतर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन प्रसार झाले होते. या आरोपींनी औसा, किल्लारी, भादा, रेनापुर, चाकूर, अहमदपूर तसेच शेजारील राज्यांमध्ये घरपोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले होते. फरार आर नबी ोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रवाना करण्यात आले होते. अटक आरोपींची १० दिवस पोलीस कोठडी मिळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी लातूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यावरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच भादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एकूण ०५ पथके तयार करून त्यांना सूचना देऊन रवाना करण्यात आले होते. समीर शमशुद्दीन शेख, वय ३० वर्ष, रा. बीड याला ०५ लाख ७२ हजार रुपयाच्या विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व एक ८ लाख रुपयाची इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आले आहे. ४ लाख रुपयेचा किराणा मालहस्तगत करण्यात आला आहे.
एकंदरीत लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे रेणापूर, चाकूर, वाढवणा, उदगीर शहर, किनगाव येथील प्रत्येकी एक तर अहमदपूर पोलीस ठाण्यामधील चोरीच्या ०३ गुन्ह्याची अशा एकूण ०९ गुन्ह्याची उकल झाली असून गुन्ह्यात चोरलेला व गुन्ह्यात बापरलेले वाहन असा एकूण २४ लाख ८० हजार २५० रुपयाचा मुद्देमाल सदरच्या टोळीकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याचे तांबे यांनी सांगितले.