There is an atmosphere of fear among traders due to theft incidents in Kingaon.
गोरख भुसाळे
किनगाव : दिनांक २४ आणि २५ रोजी झालेल्या चोरीच्या घटनेने किनगाव परिसर हादरला असून नागरिकांत व व्यापाऱ्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच झालेली सुरत व्यापाऱ्याची लूट, बसस्थानकात महिलेचे गळ्यातील सोने चोरी तर एका बांधकाम कामावरील २ टन लोखंडी गजाळी चोरीची घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. या ठाण्यात पंधरा दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या सापोनी वैभव नेटके यांच्या समोर चोरांना पकडण्याचे आव्हान आहे. या चोरी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
सुरत व्यापा-याच्या लुटीच्या घटने बरोबर आणखी चोरीच्या घटनां याभागात झाल्या आहेत. यामुळे पोलिसांन समोर चोरांना पकडण्याचे आव्हान आहे. दिनांक २४ जून रोजी येथील महादेव रस्त्याच्या बाजूला व बोडके यांच्या बांधकाम सुरू असलेल्या कामावरील अंदाजे २ टनच्या वर असलेली बांधकाम गजाळी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
दिनांक २५ रोजी केंद्रेवाडी येथील दोन महिला या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी किनगाव येथे आल्या आणि दवाखान्यात दाखवून औषध उपचार घेऊन परत बसस्थानकात आल्या व आपल्या गावी केंद्रेवाडी जाण्यासाठी निघाल्या, अंधोरी मार्गे अहमदपूर जात असलेली वस आली या बस मध्ये चढताना गळ्यातील सोन्याचे दागिने पाठीमागून कुणीतरी ओढून चोरले.
यात ५४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार महिलेने ठाण्यात दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. या आठवड्यात झालेल्या चोरीच्या घटनेने किनगाव परिसर हादरला आहे. चोरीच्या घटनां थांबवण्याचे आव्हान नेटकेच पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेल्या सपोनी वैभव नेटके आणि पोलिसांसमोर आहे.
किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपरा पुलाजवळ सुरतच्या व्यापाऱ्याची गाडी अडवून १ कोटी ८० लाख रुपये लुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. या घटनेवरून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचे सत्य बाहेर येणे गरजेचे असून घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला दोन दिवस लागले. आरोपींना लवकर बेड्या पोलीस टाकतील असे पोलिस सांगत आहेत.