The most magnificent temple of Saint Tukobaraya in the country should be built in Latur: A. Ramesh Appa Karad
लातूर, पुढारी वृत्तसेवाः लाखो लोकांना एकत्र आणण्याची खरी ताकद फक्त संत विचार आणि संतवाणीत आहे जोपर्यंत सांप्रदाय जिवंत आहे तोपर्यंत सर्व समाज जिवंत असेल सांप्रदाय टिकला तरच जग टिकणार असून जगद्गुरु तुकाराम महाराजांचे देशातील सर्वात भव्य मंदिर लातूरात व्हावे, अशी कामना करीत जिथे संकल्प असतो तिथे कसलीही अडचण येत नाही असा विश्वास भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने व्यक्त केला.
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी आणि कैवल्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीच्या ७५० व्या जन्म उत्सव सोहळ्यानिमित्त लातूरनजीक खंडापूर गावाजवळ अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्ताने संतांचा मेळा आणि वारकऱ्यांचा कुंभमेळा होत आहे. या अभूतपूर्व सोहळ्यात आ. रमेशआप्पा कराड आणि त्यांच्या सुविद्यपत्नी सौ. संजीवनीताई कराड यांनी शनिवारी सहभागी होऊन विविध संतांच्या पादुकाचे भक्तीभावे दर्शन घेतले.
हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या प्रवचनानंतर त्यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले. यावेळी आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, खंडापूर परिसरात साधुसंताचा या मेळ्यातून देहूचे तुकाराम महाराज, आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली आपल्या परिसरात आले त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खरोखरच आम्ही सर्वजण नशीबवान आहोत. एवढा मोठा सप्ताह देशात कुठे झाला असेल असे मला वाटत नाही, भविष्यातही अशीच संधी लातूरकरांना मिळावी सेवेसाठी लातूरकर कुठेही कमी पडणार नाही याची मला खात्री असल्याचे आ. कराड म्हणाले.
तुकोबांचे मंदिर अन् अप्पांची भावना
सप्ताह परिसरात जगदुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली. हे मंदिर देशातील सर्वात भव्य मंदिर व्हावे जिथे संकल्प सत्य असतो तिथे कुठलीही अडचण येत नाही या मंदिर उभारणी बरोबरच प्रति देहू उभे राहावे अशी इच्छा व्यक्त करून संत महात्मे जे आज्ञा, सूचना, आदेश करतील ती सेवा देण्याचे काम मी आणि माझा परिवार करेल असे सांगून लातूर ग्रामीण मतदार संघातील तब्बल ५५० भजनी मंडळांना भजनाच्या साहित्याचे वाटप केल्याचे सांगितले.
गोपाळकाला गोड
माऊली कदम महाराज यांनी शेवटच्या दिवशी होणाऱ्या पुरणपोळी जेवणाकरिता दुधाची अपेक्षा व्यक्त केली. सर्वांच्या आशीर्वादाने लातूर ग्रामीण मतदार संघाची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले असल्याचे सांगून आ. रमेशआप्पा कराड यांनी लागेल तेवढे दूध आणि तूपही देऊ असे जाहीर केले त्याचबरोबर या सप्ताहाच्या नियोजनासाठी अकरा लक्ष रुपयाची यावेळी मदत केली.