Latur Accident : उदगीर-अहमदपूर मार्गावर एसटी बस उलटली; प्रवाशांची थरारक सुटका file photo
लातूर

Latur Accident : उदगीर-अहमदपूर मार्गावर एसटी बस उलटली; प्रवाशांची थरारक सुटका

साईड देताना चालकाचा ताबा सुटला; ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दुर्घटना टळली

पुढारी वृत्तसेवा

ST bus overturns on Udgir-Ahmadpur route; passengers rescued in a harrowing ordeal

उदगीर, पुढारी वृत्तसेवा : उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी गावाजवळ गुरुवारी दुपारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला. अरुंद पर्यायी रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर बसमधील अनेक प्रवासी अडकून पडले होते. मात्र ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केल्याने सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर-अहमदपूर मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरू होती. सुकणी गावाजवळ बस पोहोचली असता समोरून आलेल्या वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला झुकली आणि चालकाचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बसच्या खिडक्या व दरवाजांमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून काही जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात। येत आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक तूक विस्कळीत झाली होती. पोलिस व प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT