Jalna Accident News : हायवा-स्कुटीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार; दोघी जखमी

जालना-राजूर रोडवर अपघात; अपघातानंतर हायवा उलटला
Jalna Accident News
Jalna Accident News : हायवा-स्कुटीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार; दोघी जखमीfile photo
Published on
Updated on

Female student killed, two others injured in collision between Hyva truck and Scooty

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना-राजुर रोडवरील तांबोली पेट्रोल पंपाजवळ भरधाव हायवाने स्कुटीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक महाविद्यालयीन युवती ठार तर अन्य दोनजणी जखमी झाल्या अपघातानंतर हायवा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हायवा रस्त्यावर उलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

Jalna Accident News
१८ वर्षीय तरुणीला हायवा चालकाने चिरडले

राजूरकडून जालना शहराकडे दगड घेऊन येणारा भरधाव हायवा (क्र एमएच-२१-बीजी-४५००) ने स्कुटीला चुकीच्या दिशेने जात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वैष्णवी जगन्नाथ खांडेभराड (१८) ही ठार झाली तर अश्विनी कैलास बदर व कल्याणी किरण काळे (रा. तांदुळवाडी, जिल्हा धाराशिव) या दोन जणी जखमी झाल्या.

अपघतात मयत व जखमी झालेल्या विद्यार्थिनी या शहरातील ओजस महाविद्यालयात डी फार्मसीचे शिक्षण घेत होत्या अशी माहीती मिळाली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तीनही विद्यार्थीनी दुचाकी (क्र एमएच-२१-डीए-२०७०) वरुन राजूरकडे जात असतांना हा अपघात झाला. अपघातानंतर हायवा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हायवा रस्त्यावर उलटला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

अपघातानंतर वैष्णवी खांडेभराड हिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तीला मयत घोषित केले. अपघातातील अन्य दोन विद्यार्थीनींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच ओजस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जालना शहरासह जिल्हयात मोठ्या संख्येने हायवा रस्त्यावर मुक्तसंचार करताना दिसत आहेत.

Jalna Accident News
Vehicle Fire : वडीगोद्रीजवळ हायवा पेटला, चालक- मजूर वाचले

अनेक हायवावर क्रमांक खोडलेले असल्याचे पहावयास मिळत आहे. आरटीओ व पोलिस विभागाने यावर कारवाई करणे गरजेचे आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात हायवा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. महाविद्यालयीन युवतीच्या मृत्यूने विद्यार्थीवर्गात खळबळ उडाली आहे.

अपघातानंतर हायवा रस्त्यावर उलटल्याने रहदारीच्या या रस्यावर दगड विखुरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी चंदनझिरा पोलिसांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news