Latur Bus Accident | उदगीर-अहमदपूर मार्गावर समोरील वाहनाला साईड देताना एसटी बस उलटली; अनेक प्रवाशी जखमी

उदगीरहून अहमदपूरकडे जात असताना सुकणी गावाजवळ बसला अपघात
Udgir Ahmedpur Road Bus Accident
उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी गावाजवळ बस पलटी होऊन अपघात Pudhari
Published on
Updated on

Udgir Ahmedpur Road Bus Accident

उदगीर : उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी गावाजवळ शुक्रवारी (दि.१२) दुपारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून गंभीर जखमींना उपचारासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एसटी बस उदगीरहून अहमदपूरकडे जात असताना सुकणी गावाजवळील अरुंद पर्यायी रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

Udgir Ahmedpur Road Bus Accident
Latur News : मधमाशांना आकर्षित करण्याचा शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना त्वरित उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. काही जणांना किरकोळ दुखापत झाली असून गंभीर जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.

logo
Pudhari News
pudhari.news