Latur Accident News : एसटीची स्कूलबसला धडक; चालकासह पाच प्रवासी जखमी file photo
लातूर

Latur Accident News : एसटीची स्कूलबसला धडक; चालकासह पाच प्रवासी जखमी

लातूरमधील घटना, विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

ST bus collides with school bus; five passengers, including the driver, injured

लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर-औसा मार्गावरील पेठ शिवारातील किड्स इन्फोपार्क शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या चार स्कूलबसना एसटी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली. त्यानंतर एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. सुदैवाने धडकेवेळी स्कूलबसमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

ही घटना सोमवारी (दि. २७) दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास घडली. लातूरचे आगार व्यवस्थापक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरहून औसाकडे जाणाऱ्या एसटी बसमधील एक प्रवासी चालकाच्या केबीनमध्ये घुसला व त्याने मला मरायचे आहे म्हणत जोरात स्टेअरिंग ओढली. त्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूलबसवर जाऊन आदळली व त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

यामुळे बसमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. एसटी बसचे चालक महादेव देवराव देवगुंडे (५०) यांच्या तोंडाला मार लागला असून, त्यांच्यावर लातूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान स्टेअरिंग ओढलेल्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाहकाने त्याच्याविरुध्द फिर्याद दिल्याचे राठोड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT