Latur News : भिसे वाघोलीसह परिसरात मुसळधार पाऊस; पिकांना जीवदान

लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोलीसह परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
latur rain news
Latur News : भिसे वाघोलीसह परिसरात मुसळधार पाऊस; पिकांना जीवदानfile photo
Published on
Updated on

Heavy rain in Bhise-Wagholi and surrounding areas; crops get a new lease of life

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोलीसह परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

latur rain news
Latur crime : दोन दुचाकी चोर जेरबंद; आठ चोरीच्या वाहनांसह मुद्देमाल जप्त

यंदाच्या जून महिन्यापासून प्रथमच एवढ्या जोरदार पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहिल्यास परिसरातील नदी, नाले आणि ओहे तुडुंब भरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पिकांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, ज्या भागात अद्याप पेरण्या झाल्या नव्हत्या, तेथेही या पावसामुळे पेरणीला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

latur rain news
Latur News : सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार

खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. ही माहिती सत्तार पटेल यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news