Latur News : सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार

पोलिस अभिलेखानुसार उत्तम गायकवाड याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल
Latur Crime News
Latur News : सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपारFile Photo
Published on
Updated on

Latur News: Criminals deported from Latur district for one year

लातूर, पुढारी वृतसेवा: लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी शिरूर अनंतपाळ येथील सराईत गुन्हेगार उत्तम शिवराम गायकवाड (वय ५५) याला एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.

Latur Crime News
Beed News : बीड जिल्ह्यातील ९७ हजार शेतकऱ्यांना झाली कर्जमाफी

पोलिस अभिलेखानुसार उत्तम गायकवाड याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या हालचालींमुळे सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याने हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

Latur Crime News
Beed news : दिंद्रुड परिसरातील बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधितास नोटीस बजावून त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच साक्षीदारांचे जबाब, गुन्हेगारी अभिलेख, प्रतिबंधात्मक कारवायांची नोंद, पोलीस अहवाल आणि इतर कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात आली. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधिताच्या वर्तणुकीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे तसेच त्याच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीचा अंतिम आदेश पारित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news