किनगाव: राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी सर्व महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून किनगाव येथे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामुळे नागरिकांना वेगवान प्रशासकीय सेवा मिळतील,गतीशील प्रशासनाचे हे एक उत्तम उदाहरण असून,नागरिकांनी आपल्या समस्या आणि तक्रारी या व्यासपीठावर मांडून समाधान करून घ्यावे असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांशी थेट नाळ जुळलेला विभाग आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
नागरिकांना एकाच छताखाली महसूल विभागाच्या विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देऊन शासनाच्या योजना जनतेच्या दारी पोहचवण्याचा प्रयत्न समाधान शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले. या समाधान शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर,जिल्हा परिषद सदस्य अश्विन नागराळे,प्रतिक्षा गुट्टे,पंचायत समिती सदस्या सुरेखा मुंडे,अयोध्या केंद्रे,माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे,माजी सभापती किशोर मुंडे, प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, मंडळाधिकारी अण्णाराव नागदरे, ग्राम महसूल अधिकारी गायत्री ताले,सौदागर वैद्य,भागवत गुट्टे, अशोक मुंडे, नागरिक विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी, नागरिक व पत्रकार आदी जण उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार उज्ज्वला पांगारकर यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. रामलिंग तत्तापुरे यांनी केले आणि आभार अविनाश पवार यांनी मानले.