Rena Dam : रेणा धरणाची पाणी पातळी पाच सेंमीने वाढली; ३२ टक्के जलसाठा  File Photo
लातूर

Rena Dam : रेणा धरणाची पाणी पातळी पाच सेंमीने वाढली; ३२ टक्के जलसाठा

तालुक्यात सर्वत्र रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील आंतरमशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Rena Dam water level increased by five cm; 32 percent water storage

रेणापुर, पुढारी वृतसेवा : रेणा मध्यम प्रकल्पाच्या साठवण क्षेत्रात २६ जुलै नंतर १५ ऑगस्टला दमदार पाऊस पडल्याने धरणातील पाण्याची पातळी पाच टक्क्याने वाढली असून ती ३२ टक्के झाली आहे. सध्या धरणात पाण्याचा येवा सुरू असल्याने आनखी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. १५ व १६ ऑगस्टला तालुक्यात सर्वत्र रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील आंतरमशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे.

तालुक्यात २६ जुलैनंतर मोठा पाऊस झाला नाही, पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मध्यांतरी पावसाने ओढ दिल्यामुळे रेणा धरणातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक झाली होती. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती, परंतु १५ ऑगस्टच्या पावसाने पाच सेंमी धरणाची पातळी वाढली त्यामुळे या वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही असे दिसत आहे.

जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर तब्बल एक महिना पाऊस पडला नाही त्यानंतर रेणा धरण क्षेत्रात २६ जुलैला दमदार पाऊस झाला या एकाच दिवसात ५ महसूल मंडळात २९४ मिमी पावसाची नोंद झाली. एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर १७, २२, २६ व २७ जुलैला सलग चार दिवस पाऊस झाला या चार दिवसाच्या पावसाने रेणा मध्यम प्रकल्पात पाच टक्क्‌यांनी पाण्याची पातळी वाढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT