लातूर : तब्बल १० हजार ७६७ किलोमीटरचा प्रवास करून मेळघाटातून निसर्गमुक्त केलेल्या दुर्मिळ भारतीय गिधाडाने औसा तालुक्यात मुक्काम केला. लातूर जिल्ह्यात या गिधाडाच्या दर्शनाची पहिली नोंद झाली असून, वन्यजीव अभ्यासकांसाठी ही महत्त्वपूर्ण घटना ठरली आहे.
सात वर्षीय या मादी गिधाडाच्या पाठीवर बसविलेल्या ट्रॅकिंग उपकरणामुळे तिच्या रोमांचक स्थलांतराचा प्रवास उलगडला आहे.१८ नोव्हेंबर रोजी रात्री हे गिधाड लातूर जिल्ह्यात आल्याची माहिती अभिजित रसाळ यांनी लातूरचे वन्यजीवप्रेमी धनंजय गुट्टे यांना दिली. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक अमितराज जाधव, धनंजय गुट्टे आणि डॉ. दत्ता आंबेकर यांनी निरीक्षण मोहीम राबविली.
औसा तालुक्यातील शिवली शिवारातील एका झाडावर बसलेले गिधाड त्यांना आढळले. त्याच्या पायातील पिवळ्या रंगाच्या रिंगवर एफ १४, तर निळ्या रंगाच्या रिंगवर एम ९९ अशी नोंद होती. छायाचित्रण व व्हिडिओद्वारे नोंद घेतल्यानंतर ते गिधाड सकाळी ९.४० वाजता उडून गेले.
एफएसआय'चा वापर करून महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निधीतून नवीन बसेसची खरेदी आणि त्यांच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) हरियाणातील पिंजोर येथील प्रजनन केंद्रात जन्मलेल्या या गिधाडाला २८ मे २०२६ रोजी मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सोमठाणा वनपरिक्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील विविध भागांत भ्रमंती करत त्याने १० हजार ७६७ किलोमीटरचे अंतर पार केले.
विशेष म्हणजे, मध्यप्रदेशातील हलाली धरण परिसरात १८ सप्टेंबर रोजी रानटी गिधाडांच्या समूहात ते आढळले. लातूरमधील मुक्कामानंतर हे गिधाड ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे पोहोचले. अतिगंभीर संकटग्रस्त श्रेणीतील भारतीय गिधाडाच्या या प्रवासामुळे त्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना नवी आशा मिळाली आहे. रामायणातील जटायूची आठवण करून देणाऱ्या या पक्ष्याचे अस्तित्व टिकविणे ही निसर्गप्रेमींची सामूहिक जबाबदारी आहे.