Public response to MLA Karad's Janata Darbar
लातूर, पुढारी वृतसेवा: प्रत्यक्ष संवादातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, अडीअडचणी समजून घेता याव्या यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी मुरुड येथे घेतलेल्या जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्यांचा या दरबारात नागरिकांनी पाढाच वाचला. या सर्व प्रश्नांची गांभीयनि दखल घेऊन जे शक्य आहेत ते प्रश्न जागेवरच त्यांनी सोडविले. इतर प्रश्न संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे देऊन तत्काळ कारवाई करून निकाली काढण्याच्या सूचना आ. कराड यांनी दिल्या.
लातूर तालुक्यातील निवळी, चिंचोली बल्लाळनाथ, काटगाव, एकुर्गा, गादवड या जिल्हा परिषद मतदार संघासह मुरुड शहर या कार्यक्षेत्राचा जनता दरबार होता. यावेळी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत, भाजपाचे विक्रम शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, भागवत सोट, मुरुडच्या सरपंच अमृता नाडे, उपसरपंच हनुमंतबापू नागटिळक, सुरज शिंदे, प्रताप पाटील, वैभव सापसोड आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होती.
गेल्या दहा पंधरा वर्षांत गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना आमदारांना भेटता आले नाही, आपले प्रश्न मांडता आल्या नाहीत तथापि ज्यांचा कोणी वाली नाही त्याला न्याय देण्याची भूमिका घेऊन, आ. कराड यांनी हा दरबार घेतला. मुरुड शहरासह ग्रामीण भागातील विविध गावातील नागरिकांनी शेतस्ते, घरकुल, समशानभूमी, अतिक्रमणे, शेतीतील वीज प्रश्न, कबाले, समाज मंदिर, निराधारच्या पगारी, रेशन दुकानचे प्रश्न, आरोग्यविषयक तक्रारी, विविध गावातील अवैधधंदे, मुरुड येथील रेल्वे स्थानक विकसित करावे, एमआयडीसी सुरू करावी, अवजड वाहने मुरुड शहराच्या बाहेरून जावीत आदी मागण्यांचे निवेदन देऊन जनता दरबार घेतल्याबद्दल आ. कराड यांचे आभार मानले. बोगस कामाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात येईल रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ काढून मोकळे करावेत, जनतेच्य प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना करून आ. कराड यांनी दिल्या.
सहा तास चाललेल्या या जनता दरबारात प्रत्येक नागरिकांशी आ. रमेशआप्पा कराड यांनी संवाद साधून प्रश्न समजून घेते जे शक्य आहे त्या प्रश्नांचा तडकाफडकीने निर्णय केले तर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या. नागरिकांच्या सर्वच निवेदनावर महिनाभरात कार्यवाही झालेली दिसेल अडचणीच्या विषयात निश्चितपणे योग्य तो मार्ग काढला जाईल नागरिकांनीही सहकार्य करावे. ग्रामीण मतदार संघात चारही ठिकाणी दर तीन महिन्याला जनता दरबार घेणार असल्याचे आ. कराड यांनी सांगितले.