Police raids on sand deposits in Ahmedpur
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राळगा शिवारात रेती ४४साठ्यांवर धाड टाकून वीस ब्रास रेतीसह दोन जेसीबी, चार टिप्पर, एक बोलेरो गाडीसह एक कोटी ४६ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलिस उपअधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, अहमदपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक बी. डी. भुसनूर यांनी राळगा शिवारातील सखाराम नामदेव राठोड याच्या शेतात धाड टाकून दोन जेसीबी (किंमत ६० लाख), चार टिप्पर (किंमत ८० लाख), एक बोलेरो गाडी (किंमत ५ लाख), वीस ब्रास रेती (किंमत १ लाख), आठ मोबाईल किंमत ७६५०० रुपये), २१५०० रुपये नगदी असा १ कोटी ४६ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रशांत महेंद्र आगलावे वय ३३ वर्षे रा. चिलका ता. अहमदपूर, ओमकार सुग्रीव जाभाडे वय २१ वर्ष रा. शिंदगी बुद्रुक ता. अहमदपूर, संगमेश्वर निवृत्ती नरवटे वय ३१ वर्ष रा. करंजी ता. जळकोट, संतोष सतीश शेळके वय ३२ वर्ष रा. कोकणगा ता. अहमदपूर, सखाराम नामदेव राठोड वय ३८ वर्ष राळगा तांडा, ता. अहमदपूर. शेख फत्तूसाब इस्माइल वय ५५ वर्ष रा. हेर ता. उदगीर, प्रशांत उत्तम नाटे वय २२ वर्ष रा. गोताळा ता. अहमदपूर, भैयासाहेव बळीराम कांबळे वय ५० वर्षे कबनसांगवी ता. चाकूर, संतोष कुलाल उदगीर, सोमनाथ माळी रा. हेर ता. उदगीर, दस्तगीर पठाण रा. उदगीर, आदींवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.