Nilanga sugarcane fire pudhari photo
लातूर

Latur News : दुष्काळात जपलेला तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

काटेजवळगा शिवारातील घटना; पंचनामा करून मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

निलंगा : दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही मोठ्या कष्टाने जपलेला तीन एकर ऊस अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना काटेजवळगा शिवारात घडली. या आगीत प्रशांत लांबोटे यांच्या सर्व्हे नंबर ७० मधील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी काटेजवळगा गावचे सरपंच शरद सोमवंशी यांनी तात्काळ भेट देऊन शेतकऱ्याला धीर दिला यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेती करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. उपलब्ध पाण्यावर आणि मोठ्या मेहनतीने लांबोटे यांनी ऊसाचे पीक जोपासले होते. मात्र, पीक ऐन काढणीच्या टप्प्यात असताना आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.

आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्टता नसून अज्ञात व्यक्तीने ऊस पेटविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.महसूल व संबंधित प्रशासनाने घटनास्थळी तातडीने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्याला शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच ऊस जाळण्यामागील कारणाचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT