Jalna Jan Aakrosh Morcha : जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमिहीनांचा जनआक्रोश मोर्चा

भूमिहीन कास्तकारांना सातबारा देण्याची मागणी
Jalna Jan Aakrosh Morcha
जालनाः जिल्हाधिकारी कार्यालयावर अशा प्रकारे भूमिहीन शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना: दलित, आदिवासी, भूमिहीन कास्तकर आणि वंचित समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने सोमवार, दि.२८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

हातात मागण्यांचे फलक घेत आंदोलकांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनेक वर्षांपासून जमिनीवर प्रत्यक्ष शेती करणार्‍या भूमिहीन कास्तकारांच्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न प्रलंबित आहे. या कास्तकारांना त्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे देऊन जमिनीवरील हक्क निश्चित करावा, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

Jalna Jan Aakrosh Morcha
Lonar tourism : जगाच्या नकाशावर लोणार; पण पर्यटकांच्या नकाशावर कधी?

वर्षानुवर्षे जमिनीवर कष्ट करून शेती करणार्‍या भूमिहीन कास्तकारांना अद्यापही जमिनीच्या मालकीचा अधिकृत हक्क मिळालेला नाही. प्रत्यक्ष शेती करणार्‍या कास्तकारांच्या जमिनीचा प्रश्न शासनाने गांभीर्याने सोडवून त्यांना सातबारा उतारे देण्याची कारवाई करण्यात यावी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील वंचित घटकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच रोजगाराची साधने उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आल्या. या मोर्चात बहुसंख्य भूमिहीन शेतकरी, महिला सहभागी झाल्या होत्या.

Jalna Jan Aakrosh Morcha
Chhatrapati Sambhajinagar Crime : तुम पोलिस है तो क्या हुआ ? म्हणत भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news