Shivraj Motegaonkar Amit Deshmukh  Pudhari
लातूर

Shivraj Motegaonkar: NEET पेपरफुटी प्रकरणाला राजकीय वळण; शिवराज मोटेगावकर हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा भाजपचा दावा

Shivraj Motegaonkar Viral Video: NEET पेपरफुटी प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून भाजपने अटकेत असलेल्या शिवराज माटेगावकर यांचा काँग्रेसशी संबंध असल्याचा दावा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shivraj Motegaonkar Viral Video: NEET पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या शिवराज मोटेगावकर यांच्यावरून आता राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपने गंभीर आरोप करत मोटेगावकर हे काँग्रेसशी संबंधित असून माजी मंत्री आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. यानंतर हे प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता त्याला राजकीय रंग चढला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2024 च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर हे प्रचार सभेत बोलताना दिसत असून, “आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावलय,” असं वक्तव्य केलं आहे.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर थेट निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, “सीबीआयच्या जाळ्यात अडकलेला मोठा मासा शिवराज मोटेगावकर हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख यांच्या प्रचार सभेत त्यांनी सात जन्म काँग्रेस पक्षाचे कुंकू पुसणार नसल्याची प्रतिज्ञा केली होती.”

कुलकर्णी यांनी पुढे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका करत, NEET पेपरफुटी प्रकरणावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नसल्याचा दावा केला. तसेच, नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसने अमित देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मात्र, या आरोपांवर काँग्रेस किंवा अमित देशमुख यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. शिवराज मोटेगावकर यांचे काँग्रेसशी नेमके संबंध काय होते, याबाबतही अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही राजकीय दुवे समोर येणार का, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT