NEET Paper Leak Case: सीबीआयने शिवराज मोटेगावकरला अटक का केली? कोणती कलमं लावली? तपासात नाव कसं आलं?

NEET Paper Leak Case: NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBIने ताब्यात घेतलं आहे.
NEET Paper Leak Case Shivraj Motegaonkar
NEET Paper Leak Case Shivraj MotegaonkarPudhari
Published on
Updated on

NEET Paper Leak Case: देशभरात चर्चेत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाने आता मोठं वळण घेतलं आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणखी गंभीर असल्याचं स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, केवळ चौकशीपुरतं हे प्रकरण मर्यादित न राहता तपास यंत्रणेला काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा केला जात आहे.

CBIची चौकशी नेमकी कुठून सुरू झाली?

वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूरमध्ये CBIचं विशेष पथक काही दिवसांपूर्वी दाखल झालं होतं. तब्बल 28 अधिकाऱ्यांच्या पथकाने शिवराज मोटेगावकर यांची सलग आठ ते नऊ तास चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मिळालेल्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने आणि काही संशयास्पद बाबी समोर आल्याने CBIने पुढील कारवाईचा निर्णय घेतला.

मोटेगावकरांचं नाव तपासात कसं आलं?

या संपूर्ण प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनंतरच मोटेगावकर यांचं नाव CBIच्या रडारवर आलं. त्यानंतर लातूरमध्ये चौकशी, कागदपत्रांची तपासणी आणि डिजिटल पुराव्यांची पडताळणी सुरू करण्यात आली.

CBIच्या संशयाची मुख्य कारणं काय?

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, मोटेगावकर यांच्यावर NEET UG 2026 परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्यामध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष सहभागाचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात ते कथित पेपरफुटी रॅकेटशी संबंधित काही व्यक्तींच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे.

CBIने 14 मे रोजी लातूरमधील शिवाजी नगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली होती. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये NEET परीक्षेशी संबंधित संशयास्पद कंटेंट आणि कथित फुटलेल्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित माहिती सापडल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. यानंतर मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला.

NEET Paper Leak Case Shivraj Motegaonkar
Raja Shivaji Box Office: ‘राजा शिवाजी’ने इतिहास रचला; रितेश देशमुखच्या सिनेमाने पार केला 100 कोटींचा टप्पा

तपासात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. कथितरित्या फुटलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरांच्या प्रती काही व्यक्तींना पुरवल्याचा संशय CBIने व्यक्त केला आहे. या साखळीत आणखी काही लोक सहभागी असल्याची शक्यता तपासली जात असून, सर्व नावे अद्याप अधिकृतरीत्या उघड करण्यात आलेली नाहीत.

याशिवाय, परीक्षा झाल्यानंतर संभाव्य पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करणे, संगनमत आणि सार्वजनिक परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्यासंबंधीच्या विविध मुद्द्यांवर तपास सुरू आहे.

NEET Paper Leak Case Shivraj Motegaonkar
Maharashtra Election: विधान परिषद निवडणुकांची घोषणा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान

कोणत्या कायद्यांखाली कारवाई?

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील फसवणूक, गुन्हेगारी कट, पुरावा नष्ट करणे आणि संगनमताशी संबंधित विविध कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

CBIच्या तपासात आता डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि पेपरफुटीशी संबंधित नेटवर्क यांची छाननी केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रात विश्वासाला तडा देणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news