नीट पेपरफुटी प्रकरणी अटक केलेल्या संजय जाधव याला आज न्यायालयात हजर केले.  Pudhari News Network
लातूर

नीट पेपरफुटी प्रकरणी संजय जाधवला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

इच्छुक विद्यार्थी, पालकांचा शोध घेऊन करायचा डील

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृत्तसेवा : नीट पेपर फुटी प्रकरणातील फरार आरोपी शिक्षक संजय तुकाराम जाधव (रा. लातूर) याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.२४) रात्री उशीरा अटक केली होती. मंगळवारी (दि.२६) त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी एन. एन. चव्हाण यांनी त्याला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Summary

  • नांदेड येथील एटीएस पथकाकडून संजय जाधवची चौकशी

  • संजय जाधव हा इच्छुक विद्यार्थी किंवा त्यांचे पालक हेरायचा

  • जाधव विद्यार्थ्यांना इरन्ना कोनगलवारकडे पाठवायचा

नांदेड येथील एटीएस पथकाकडून जाधव याची चौकशी

नीटच्या पेपरफुटीत सहभाग असल्याच्या संशयावरुन नांदेड येथील एटीएस पथकाने २२ जून रोजी जलील उमरखा पठाण व संजय जाधव यांची चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून दिले होते. तथापि गरज भासल्यास बोलावले जाईल. त्यामुळे तुम्ही कोठेही जावू नका, असे पोलिसांनी त्यांना बजावले होते. दरम्यान, या प्रकरणातील या दोन आरोपींसह उमरगा येथील इरान्ना कोनगलवार यांचे एकूण सहा मोबाईल पोलिसांनी जप्त करुन तपासले असता त्यात नीटच्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट, विद्यार्थ्यांशी व्हॉट्सअॅपवर त्यांनी केलेली चॅटिंग, आर्थिक व्यवहार संबंधीची माहिती आढळली.

आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. पैशाच्या मोबदल्यात ते काम करीत होते. संजय जाधव हा इच्छुक विद्यार्थी किंवा त्यांचे पालक हेरायचा त्यांच्याकडून पैसे घेवून तो इरन्ना कोनगलवारकडे पाठवायचा अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

दरम्यान, हाती आलेल्या माहितीवरुन जलील उमरखा पठाण याला २३ जुलैरोजी पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. परंतु संजय जाधव फरार होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. नीट प्रकरणात संजय जाधव याचा संबंध असून या प्रकरणाची पाळेमु‌ळे विस्तारली आहेत. ती शोधून काढण्यासाठी व या प्रकरणाचे अन्य धागेदोरे, सहभागी, संशयित यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आरोपी संजय जाधवला दहा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तीवाद सरकारी अभियोक्ता अॅड. रागिणी चव्हाण यांनी केला.

आरोपी संजय जाधव यांचे वकील अॅड. श्रीकांत बोराडे यांनी संजय जाधव यांची चौकशी यापूर्वी पोलिसांनी केली आहे. त्यामुळे कमीत कमी पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. चव्हाण यांनी आरोपी संजय जाधव यास २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT