‘नीट’ पेपरफुटीचा सूत्रधार अक्कलकोटमधील शिक्षक..!

'नीट' पेपरफुटी प्रकरणात अक्कलकोटच्या शिक्षकाचा सहभाग उघड
NEET Paper Leak: Teacher Accused in Akkalkot
‘नीट’ घोटाळ्याचे सोलापूर कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. File Photo
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘नीट’ घोटाळ्याचे सोलापूर कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटीतील सूत्रधार असलेला मूळचा लातूरचा; परंतु सध्या अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेला संजय जाधव याच्याविषयी सर्व माहिती जमा करण्याच्या कामाला सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन लागले आहे.

पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्राशी निगडित असल्याचे समोर

‘नीट’ पेपरफुटीमुळे सध्या देशभर प्रचंड गदारोळ सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणार्‍या व पवित्र अशा शिक्षण क्षेत्रास कलंक असलेल्या या पेपरफुटीतील सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या नादाला देशभरातील पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. या पेपरफुटीचा तपास केंद्र सरकारने नुकताच सीबीआयकडे दिला आहे. अशातच या प्रकरणाचे काही धागेदोरे महाराष्ट्राशी निगडित असल्याचे समोर आले होते. तपासाअंती चक्रे जसजशी वेगाने फिरू लागली तसतशी यातील सूत्रधारांची नावेही पुढे येऊ लागली आहेत. त्यातील संजय जाधव हा आहे. मूळचा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील ढोकी तांडा येथील असलेल्या जाधव याने माढा तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत काही काळ नोकरी केली आहे.

NEET Paper Leak: Teacher Accused in Akkalkot
IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाची नांगी ठेचली; टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

संजय जाधवने अक्कलकोट तालुक्यातील शाळेत करून घेतली बदली

गतसप्ताहात सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या विनंती बदल्या केल्या. त्याअंतर्गत संजय जाधव याने पत्नी मनोरुग्ण असल्याचे कारण देत माढा तालुक्यातील टाकळी येथून अक्कलकोट तालुक्यातील शाळेत बदली करून घेतली. शिक्षक जाधव याने अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेताना पत्नी मनोरुग्ण असल्याचे कारण दिल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी केला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी संबंधित शिक्षकांची माहिती माढा तालुका गटशिक्षणाधिकार्‍यांकडून मागविली आहे.

NEET Paper Leak: Teacher Accused in Akkalkot
'बिद्री'ची अंधाऱ्या रात्रीची चौकशी केवळ आमदार आबीटकरांमुळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news