अमित देशमुख  File Photo
लातूर

Latur News : एमआरआय, सिटीस्कॅन मशीन तातडीने उपलब्ध करा : लातूरकर

आ. अमित देशमुखांच्या प्रश्नांचे अन् सरकारच्या आश्वासनाचे जिल्हाभर स्वागत

पुढारी वृत्तसेवा

MRI, CT scan machines available immediately Laturkar MLA Amit Deshmukh

लातूर, पुढारी वृतसेवा लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना दिले आहे. आमदार अमित देशमुख यांनी विचारलेल्या या प्रश्नाचे व त्यावर मंत्रिमोहदयांनी दिलेल्या हे आश्वासनाचे स्वागत करीत हे आश्वासन तातडीने वास्तवात यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान आ. अमित देशमुख यांनी गुरुवारी ३ जुलै लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन मागच्या अडीच वर्षापासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

यामुळे सामान्य परिस्थितीतील रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता खाजगी भागीदारीतून या मशीन उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय घेतला आहे, याचे कारण काय? या अत्यंत महत्त्वाच्या सुविधेसाठी शासनाकडे पैसा नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सामान्य परिस्थितीतील रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळे एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन खरेदीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देशमुख यांनी यावेळी लावून धरली. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खाजगी भागीदारीची बाब मान्य केली परंतु लातूर येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

विधानसभा अध्यक्षांची सूचना अन् दादांचा होकार या चर्चेत हस्तक्षेप करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मशीन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याची सूचना, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना केली. त्यानीही ती सूचना मान्य करीत याकामी ताबडतोब निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT