MLA Karad's seven and a half hour public darbar in Renapur
लातूर, पुढारी वृत्तसेवा: लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि अडीअडचणी समजून घेण्यासाठी आयोजित करण्यात आ लेला रेणापूर तालुक्याचा जनता दरबारास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल साडेसात तास हा दरबार सुरू होता. या जनता दरबारास हजारो जणांनी आपले प्रलंबित असलेले प्रश्न आ. कराड यांच्या समोर मांडले. या सर्व प्रश्नांची गांभीयनि दखल घेऊन जे शक्य आहेत ते प्रश्न जागेवरच त्यांनी सोडविले.
इतर प्रश्न संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याना तत्काळ कारवाई करून महिनाभरात निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुमित जाधव, रेणापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतीक लंबे, विक्रम शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, भागवत सोट, नवनाथ भोसले, महेन्द्र गोडभरले, शरद दरेकर, अभिषेक आकनगिरे, सतीश आंबेकर, अनिल भिसे, अनंत चव्हाण, बाबासाहेब घुले, दशरथ सरवदे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थित होती.
या जनता दरबारमध्ये रेणापूरसह तालुकाभरातील विविध गावांतील सर्व स्तरातील नागरिकांनी शेतस्ते, घरकुल, स्मशानभूमी, शिव रस्त्यावरील अतिक्रमणे, वीजप्रश्न, कबाले, समाज मंदिर, बससेवा, निराधारच्या पगारी, राशन दुकानचे प्रश्न, आरोग्यविषयक तक्रारी, विविध गावातील अवैध दारू विक्री व इतर अवैधधंदे, ग्रामसेवक, तलाठी गावात येत नाहीत यासह विविध प्रलंबित असलेल्या समस्या नागरिकांनी मुक्तपणे मांडल्या. आ. रमेशआप्पा कराड यांनी वाला गावासह रेणापूर तालुक्यात प्रत्येक गावातील अवैध दारू विक्री आणि अवैध धंदे तत्काळ बंद करण्याचे तसेच सिंधगाव येथील गाव गुंडाचा तत्काळ बंदोबस्त करण्याचा आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिला.
अतिक्रमणे तत्काळ काढून सर्व रस्ते मोकळे करावेत, जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे गांभीयनि लक्ष द्यावे, शासनाच्या विविध योजना पात्र गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, तळागाळातील माणसाला न्याय द्यावा, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक यांनी नियुक्ती दिलेल्या गावात जाऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवाव्यात अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या. गटविकास अधिकारी सुमित जाधव यांनी प्रास्तावित केले तर शेवटी रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.
रेणापूर तालुक्यात पहिल्यांदाच असा दरबार आमदार रमेशआप्पा कराड यांनी ५ ऑगस्ट रोजी रेणापूर येथील रेणुकाई मंगल कार्यालयात जनता दरबार घेतला. या जनता दरबारातून अनेकांचे प्रश्न मार्गी लागल्याने उपस्थित नागरिकांतून मोठे समाधान व्यक्त केले जात होते. पंधरा वर्षांनंतर रमेशआप्पांच्या माध्यमातून जन-तेतील आमदार बघायला मिळाला असल्याची अनेकांनी भावना व्यक्त केली. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या रेणापूर येथील बाजार समितीच्या परिसरात झालेल्या जनता दरबारची अनेकांनी आठवण केली.