MLA Karad inspects villages affected by heavy rains
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर ग्रामीण मतदार संघांतर्गत असलेल्या लातूर तालुक्यातील गावांत सततचा मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी भाजप-आमदार रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी (दि.२९) थेट बांधावर जाऊन केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शासनाच्या मदतीची खात्री दिली..
आ. कराड यांनी नागझरी, जेवळी, टाकळी, काडगाव, गाधवड, तांदूळजा, कानडी बोरगाव, भिसे वाघोली, माटेफळ, करकट्टा, भोसा, मसला, माटेफळ, करकट्टा यासह अनेक नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. शेतकऱ्यासह नागरिकांनी दिलेल्या निवेदनाचा स्वीकार केला. कानडी बोरगाव बॅरेजचे दरवाजे दुरुस्त करावेत.
भिसेवाघोली येथे रस्त्यालगत खचलेल्या विहिरमुळे बस सेवा बंद झाली असून त्या ठिकाणी तात्काळ संरक्षण भिंत बांधावी निळकंठ गावालगतच्या ओढ्यावरील पुलाची तात्पुरती दुरुस्ती करावी, कळंब-लातूर मेन रोडवरील काडगाव येथील चौकात सातत्याने पाणी साचत असल्याने रस्त्याची उंची वाढवण्याची सूचना आ. रमेशआप्पा कराड यांनी संबधीत यंत्रनेला केली.
यावेळी त्यांच्या समवतेत भाजपा किसान मोर्चाचे विक्रम शिंदे, भागवत सोट, नवनाथ भोसले, सुरज शिंदे, प्रताप पाटील, सतीश आंबेकर, हनुमंतबापू नागटिळक, बन्सी भिसे, वैभव सापसोड आदींसह अनेकांची तसेच संबधीत मविभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.