

Flood Affected Farmers
निलंगा: शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अतिवृष्टीच्या संकटात त्यांना मदत व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत निलंगा पोलीस आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी सांगितले.
मागच्या एक महिन्यापासून दररोजच्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याचे आवश्यक असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केलेल्या आवाहनाला निलंगा पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देत तात्काळ एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले.
सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये निलंगा पोलीस शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी फिल्डवर उतरुन काम करताना दिसत आहेत. आपले कर्तव्य बजावत शेतकऱ्यांसाठी ते करत असलेली मदत कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.