Latur Crime | 'तुला नेता बनायचंय वाटतंय!' धमकी देत कानेगावच्या सतिश येडले यांना अज्ञातांकडून गंभीर मारहाण

Latur Crime | बेहोशीचे नाटक करून जीव वाचवला!
Latur Crime
Latur Crime
Published on
Updated on

शिरूर अनंतपाळ (लातूर जिल्हा)

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील रहिवासी असलेले सतिश येडले यांच्यावर तिपराळ मध्यम प्रकल्पाजवळ दोन अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोर दुचाकीवरून (मोटारसायकलवरून) पळून गेले असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

Latur Crime
Latur Flood Relief | खाकीचे दातृत्व : अतिवृष्टीग्रस्तांना निलंगा पोलीस देणार एक दिवसाचा पगार

नेमकी घटना काय घडली?

सतिश येडले हे नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन काम आटोपून संध्याकाळच्या सुमारास घरी परतत होते. तळेगाव रस्त्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर, तिपराळ मध्यम प्रकल्पाच्या परिसरात, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अचानक अडवले.

हल्लेखोरांनी सतिश यांना त्यांचे नाव-गाव विचारले. सतिश यांनीही प्रतिप्रश्न करत त्यांची ओळख विचारली असता, त्यांनी आपण निलंगा तालुक्यातील असल्याचे सांगितले. यानंतर एका हल्लेखोराने सतिश यांच्या खांद्यावर हात ठेवत, "तुला लई नेता बनायचंय वाटतंय," अशी धमकी दिली.

सतिश यांनी त्या व्यक्तीचा हात झटकताच, परिस्थिती चिघळली. लगेचच दुसऱ्या व्यक्तीने काचेची बाटली सतिश यांच्या डोक्यात फोडली. यानंतर दुसरी बाटलीही डोक्यात मारल्याने सतिश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्लेखोरांनी शिवीगाळ करत त्यांना अवघड जागी गंभीर मारहाण केली.

सतिश यांनी केले शुद्ध हरपल्याचे नाटक

हल्लेखोर अत्यंत आक्रमक झाले असल्याचे लक्षात येताच, सतिश यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शुद्ध हरपल्याचे (बेहोशीचे) नाटक केले. त्यांना बेशुद्ध झाल्याचे समजून हल्लेखोरांनी त्यांना उचलून रस्त्यालगतच्या खंदकात टाकले. त्यानंतर ते दोघेही आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक MH. BC. 7721) घटनास्थळावरून पळून गेले. सुदैवाने, सतिश यांनी जाताना त्या मोटारसायकलचा क्रमांक पाहिला.

पोलीस स्टेशनमध्ये दाखल आणि उपचारासाठी धावपळ

काही वेळाने, त्या मार्गावरून एक शेतकरी जात असताना सतिश यांनी त्यांच्या मदतीने शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन गाठले. सतिश यांची गंभीर अवस्था आणि डोक्यातून होणारा रक्तस्राव पाहून पोलिसांनी त्यांना तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर, पुढील गंभीर उपचारांसाठी त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अमृता रुग्णालय, उदगीर येथे उपचार सुरू असल्याची माहिती कानेगावचे सरपंच ब्रम्हानंद शिवणगे यांनी दिली आहे.

Latur Crime
Latur Earthquake 1993 : भूकंपाची 32 वर्षे, समस्या कायम; प्रशासनाने ठोस निर्णय घेणे गरजेचे

पोलीस तपासात संभ्रम

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर अनंतपाळ पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यासाठी वापरलेली मोटारसायकल पोलीस स्टेशनच्या आवारात दिसून आली आहे, ज्यामुळे तपासाला दिशा मिळाली आहे.

मात्र, पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता, सदर घटनेची पोलीस स्टेशनला नोंद (FIR) झालेली नाही. सतिश एडले यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच मोटारसायकल ताब्यात घेतली असल्याने तपासाच्या प्रक्रियेवर काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भविष्यात सुरक्षेची चिंता आणि भीतीचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news