लातूर : जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने हवामान खात्याने जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उद्या शनिवारी (दि.२७) सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मराठवाड्यात पावसाने कहर केला असून लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.