

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संपूर्ण राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतली असून, पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर पूर्णपणे थांबू शकतो. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस सुरूच आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण छत्तीसगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
सारंगढ-बिलाईगडमध्ये सर्वाधिक 106.3 मिमी पावसाची नोंद झाली, जिथे ओसंडून वाहणारा नाला ओलांडण्याच्या प्रयत्नात एक कार वाहून गेली. सुदैवाने, कारमधील तिन्ही प्रवासी पोहून बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.