Latur News : नुकसानग्रस्त भागाची माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी  File Photo
लातूर

Latur News : नुकसानग्रस्त भागाची माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी

अनेक गावांतील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Latur News Former Minister mla Sanjay Bansode inspects the damaged area

जळकोट, पुढारी वृत्तसेवा मागील दहा दिवसापासून अतिवृष्टीमुळे उदगीर जळकोट मतदार संघातील विविध गावातील पशुधन व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांतील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

अशा नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी केली. तसेच प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देवून आ-पत्तीग्रस्तांना मदत करण्याचे सांगितले. त्या अनुषगांने ढोरसांगवी, बेळसांगवी गावात भेट देवून त्यांनी पाहणी केली.

जळकोट तालुक्यातील मरसांगवी, अतनूर, गव्हाण, बोरगाव, मंगरुळ या गावांसह तिरु नदीच्या काठावरील गावांची व तेथील नुकसान झालेल्या परिसराची पाहणी आ. संजय बनसोडे यांनी केली. ढोरसांगवी (ता जळकोट) येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेले शेतकरी बालाजी पोतने यांच्या घरी आ. संजय बनसोडे यांनी भेट देवून त्या कुटुंबाला धीर देवून मी आपल्या पाठीमागे खंबीर उभा असल्याची ग्वाही दिली.

यावेळी जळकोट बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकोट तालुकाध्यक्ष संग्राम हासुळे पाटील, अर्जुन आगलावे, विनायक जाधव, प्रा. श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, शशिकांत बनसोडे, माजी सरपंच संभाजी कोसंवे, तहसीलदार राजेश लांडगे, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता शीतल व्होट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय पाटील, उप विभागीय अभियंता जनार्दन उगिले, कनिष्ठ अभियंता पवन कांबळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. राजू केंद्रे, बालाजी केंद्रे, विधिज्ञ तात्या पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. सीताराम केंद्रे, रावसाहेब पाटील, विधिज्ञ रोहित केंद्रे, ढोरसांगवीच्या सरपंच सोक्षा सोनकांबळे, दिलीप सोनकांबळे, वेळसांगवीचे सरपंच धर्मपाल देवशेट्टे, परमेश्वर पोतणे, विजय होनराव, दिलीप कांबळे, शुभम केंद्रे, लक्ष्मण कुंडगीर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT