Latur News : 'जल्लोष लोककलेचा' उत्साहात समारोप file photo
लातूर

Latur News : 'जल्लोष लोककलेचा' उत्साहात समारोप

रसिकांची उत्स्फूर्त दाद, विविध प्रकारांत लातूरच्या कलाकारांची बाजी

पुढारी वृत्तसेवा

Latur 'Jallosh Folk Art' concludes with enthusiasm

लातूर, पुढारी वृत्तसेवाः महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर घडविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित 'जल्लोष लोककलेचा २०२६' या राज्यस्तरीय लोककला महोत्सवाच्या अंतिम फेरीचा रविवारी जल्लोषात समारोप झाला. २ व ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या महोत्सवात राज्यभरातून आलेल्या बालकलाकारांनी लोकनृत्य, लोकगीत आणि लोकवाद्यांचे सादरीकरण करून लातूरकर रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

लोककला महासंघाच्या अध्यक्षा तथा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी गायक मंगेश बोरगावकर, बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती महाराष्ट्रच्या अध्यक्षा तथा अभिनेत्री अॅड. निलम शिर्के-सामंत, राज्य उपाध्यक्ष अ ँड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. दीपा क्षीरसागर, राज्य कार्याध्यक्ष राजू तुलालवार, राज्य प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

समूहनृत्य प्रकारात नंदुरबारच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी प्राथमिक शाळेने सर्वोत्कृष्ट, तर पुण्याच्या ज्ञानदा प्रशालेने उत्कृष्ट क्रमांक पटकावला. लातूरच्या केशवराज रेनीसन्स विद्यालयाला प्रशंसनीय पारितोषिक मिळाले. समूहगायनात सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेने सर्वोत्कृष्ट, तर लातूरच्या ज्ञानप्रकाश संगीत विद्यालयाने उत्तम क्रमांक मिळवला.

एकल नृत्यात लातूरची सायली सुदाम तेलंगे हिने सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले. एकल गायनात बृहन्मुंबईचा प्रथमेश दांडेकर, तर एकल वाद्यात कल्याणचा मल्हार जगदीश पाटील सर्वोत्कृष्ट ठरला. एकल वाद्यात लातूरच्या रुद्र गजेंद्र राजापुरे याला प्रशंसनीय पारितोषिक मिळाले. विजेत्या बालकलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा, युथ टीम आणि लातूर शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT