विजेचा शॉक लागून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. 
लातूर

लातूर : विजेचा शॉक लागून पिता-पुत्राचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

औसा : शेतात यंत्राच्या साह्याने जनावरासाठी चारा कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.९) औसा तालुक्यातील नागरसोगा येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, नागरसोगा येथील शेतकरी तानाजी विश्वनाथ मुसांडे (वय ५० ) व त्यांचा मुलगा कृष्णा तानाजी मुसांडे (वय २५) हे दोघेही पिता-पुत्र आपल्या गावशेजारीच असलेल्या शेतात जनावरांना चारा देण्यासाठी यंत्राच्या साह्याने कडबा कुट्टी करत होते. यादरम्यान यंत्रामध्ये विद्युत पुरवठा प्रवाहित झाल्याने दोघांनाही विजेचा जोरदार झटका लागला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याबाबत औसा पोलिसात अकस्मात मृत्यूची गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT