लातूर : ७० वर्षीय महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; तरूणाला अटक

औसा तालुक्यातील धक्कादायक घटनेने खळबळ
Latur rape case
७० वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.Pudhari File Photo
Published on
Updated on

औसा : तालुक्यातील भेटा या गावात एका ७० वर्षीय महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका वृध्द महिलेच्या भोळसरपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. हत्येनंतर तीन दिवस या महिलेचा मृतदेह आरोपीच्या घरातच पडून होता. मन्सूर सादिक होगाडे (वय ३१) असे या नराधमाचे नाव आहे.

Latur rape case
बदलापूरच्या अल्पवयीन मुलींवर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता

लातूरच्या औसा तालुक्यातील भेटा गावातील मन्सूर होगाडे या आरोपीची आई बाहेरगावी गेली होती. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने ७० वर्षीय भोळसर महिलेला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर महिलेचा मृतदेह संशयित आरोपीच्या घरातच होता. तीन दिवसांने आरोपीची आई घरी परतली. घरातील एका खोलीतून दुर्गंधी येत असलेली पाहून आई त्या खोलीत गेली असता तिला या महिलेचा मृतेदह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत संशयित आरोपी मन्सूर होगाडेला अटक केली. घटनेने गांभीर्य लक्षात घेता भेटा गावात अप्पर पोलीसअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

Latur rape case
Jalgaon Crime | शेतात महिलेवर अत्याचार, फोटोही काढले...

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news