चाकूर : येथील सीमा सुरक्षा दलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन तरुणांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजता एका अल्पवयीन मुलीस लज्जास्पद वागणूक देवून तुझा व्हीडीओ काढून इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी करतो. अशी धमकी दिल्याप्रकरणी त्या तीन तरुणांविरुद्ध बाल लैंगिक संरक्षण कायद्या अंतर्गत (पोक्सो) चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चाकूरहून सीमा सुरक्षा दलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी दीड वाजता मंगेश विश्वनाथ चव्हाण, महेश लक्ष्मण साळुंके व इतर एक अशा तिघांनी संगनमत करुन त्या अल्पवयीन मुलीस आम्ही तुला ओळखतो, कॉलेज सोडुन तू कोणाला भेटण्यासाठी जात आहेस, आम्ही तुझ्या घरी फोन लावून सांगतो असे म्हणुन त्या अल्पवयीन मुलीस तुझा व्हीडीओ काढुन इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी करतो म्हणून धमकी दिली. दरम्यान त्यातील महेश लक्ष्मण साळुंके याने तीच्या हाताला धरून लज्जा वाटेल असे कृत्य केले. मुलीच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट दिली. यातील तिघेही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज नीळकंठे हे करीत आहे.