Latur Crime News : रेणापूर तालुक्यात स्प्रे मारून शेतकऱ्याची लूट नागरिकांत भीतीचे वातावरण

शेताकडे जात असलेल्या एका शेतकऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारून त्याच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून चोरटे पसार झाले.
Crime News |
Latur Crime News : रेणापूर तालुक्यात स्प्रे मारून शेतकऱ्याची लूट नागरिकांत भीतीचे वातावरण File Photo
Published on
Updated on

Farmer robbed by spraying in Renapur taluka, creating fear among citizens

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : शेताकडे जात असलेल्या एका शेतकऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारून त्याच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून चोरटे पसार झाल्याची घटना शनिवारी (दि.४ ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास रेणा-पूरपानगाव रोडवरील हनमंतवाडी पाटीजवळ घडली. रेणा-पूरचे शत्रुघ्न पाटील हे शेताकडे जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी रस्त्याचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यात पाटील बेशुद्ध पडले आणि चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून पोबारा केला.

Crime News |
Raju Shetti : दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास आंदोलन

याआधीही रेणापूरकामखेडा व पानगाव रोडवर अशाच प्रकारे शेतकऱ्यांना लुटण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बापूसाहेब कुलकर्णी व नवनाथ गोविंदपूरे या दोघा शेतकऱ्यांना लुटण्यात आले होते. तर शेलू जवळगा परिसरात एकुरके या महिलेसोबत, तसेच रेणापूर बाजार मैदानावर गिरवली गावच्या आपेट या गृहस्थासोबतही अशीच घटना घडली होती.

गेल्या दोन वर्षांत अशा लुटीच्या घटनांची मालिका सुरू असून, सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे चोरटे मोटारसायकलवरून येऊन स्प्रे मारतात किंवा शस्त्राचा धाक दाखवून दागिने काढून घेतात. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांना अंगावरील दागिने घालून बाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे.

Crime News |
Latur News : मनपा आयुक्तांकडून शहरात विविध ठिकाणांची पाहणी

पोलिसांनी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी गस्त व तपास वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांच्या मते, काही तक्रारी नोंदवल्या जात आहेत, परंतु चोरीला गेलेले ऐवज परत मिळण्याची खात्री नसल्यामुळे काही नागरिक तक्रारच करत नाहीत. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news